‘नारी शक्ती’चा गौरव; ऑक्सफोर्ड डिक्शनरीत ‘वर्ड ऑफ दि इअर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांना तुम्ही अशा काही भेटी देऊ शकता, ज्यांमुळे फक्त त्यांचा दिवसच खास होणार नाही, तर ती भेट त्यांच्या कायम लक्षात राहील. पाहुयात अशा काही खास भेटवस्तू

सामना प्रतिनिधी, मुंबई

राजकारण असो की लष्कर प्रत्येक क्षेत्रात पुरुषप्रधान संस्कृतीवर मात करीत महिलांनी आपण कुठेही कमी नाही हे दाखवून दिले. महिलांवर अत्याचार करू पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम ‘मी टू’ प्रकरणाने केल्यानंतर तर ‘नारी शक्ती’ काय आहे हे भल्याभल्यांना कळून चुकले. याचा प्रभाव इतका झाला आहे की ‘नारी शक्ती’ शब्द ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी’त समाविष्ट होत आहे. जयपूरमधील साहित्य महोत्सवात याची घोषणा करण्यात आली आहे.

‘ऑक्सफर्ड डिक्शनरी’ने ‘नारी शक्ती’ शब्द 2018चा शब्द म्हणून निवडला आहे. ‘नारी शक्ती पुरस्कारा’च्या घोषणेबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी हिंदुस्थानात झालेले प्रयत्न आणि मी टू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या शब्दाचा डिक्शनरीत समावेश करण्यात येत असल्याचे ऑक्सफर्डकडून सांगण्यात आले आहे. यासाठी नमिता गोखले, रणधीर ठाकूर, कृतिका अगरवार आणि सौरभ द्विवेदी या तज्ञांची मदत घेण्यात आली.