नाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान

नाशिक शहरासह देवळा, चांदवड, येवला, कळवण, मालेगाव आणि िंदडोरी या तालुक्यांना बुधवारी मध्यरात्री मुसळधार पावसाचा फटका बसला. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकटया नाशिक शहरात रात्री अडीच-तीन तासात 51 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 14 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व परिसरात दररोज मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी रात्री शहरात वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर दोन वाजेपर्यंत पावसाचा जोर वाढत गेला. त्यामुळे शहर परिसरातील रस्ते जलमय झाले होते. रात्री अवघ्या अडीच-तीन तासात शहरात 51 मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. आदिवासीबहुल तालुके वगळता इतरत्र जोरदार पाऊस झाला. देवळा- 83, चांदवड- 45, येवला- 33, मालेगाव, कळवण- प्रत्येकी 22, िंदडोरी- 20, सिन्नर- 10 मिलिमीटर अशी पावसाची आकडेवारी होती.

आज दुसर्या दिवशीही मालेगाव शहर, तालुका व निफाड तालुक्यात िंपपळगाव परिसरात जोरदार सरी बरसल्या. इगतपुरी आणि देवळ्यातही पाऊस सुरू होता. नांदूरमध्यमेश्वर बंधार्यातून सकाळी 15 हजार 775, तर दुपारनंतर 9 हजार 465 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. दारणातून 830, आळंदी- 30, पालखेड- 437, तिसगाव- 74, भावली- 73, वालदेवी- 107, कडवा- 212, हरणबारी- 523, नागासाक्या- 4096, गिरणा- 7428, पुनंद- 330 क्यूसेक्स इतके पाणी सोडलेले आहे.

चांदवडला 27 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
या आठवड्यात चांदवड तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. 19 सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसामुळे वडाळीभोई, धोडंबे, चांदवड, रायपूर, दिघवड, दुगाव आणि िंशगवे मंडळातील 94 गावांमधील 27 हजार 237 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.दिंडोरी तालुक्यात 19 तारखेलाच शिंदवड आणि बाबापूर गावात कांदे, टोमॅटो, सोयाबीन, मका आणि भाताचे 111 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यासह जिल्ह्यातील अनेक भागातील मका, कांदा, सोयाबीन, डाळिंब, भुईमूग आणि भाजीपाला पीक संकटात सापडले आहे.

एकूण जलसाठा 95 टक्के
जिल्ह्यातील 7 मोठ्या आणि 17 मध्यम प्रकल्पांमधील एकूण जलसाठा 62 हजार 414 (95 टक्के) झाला आहे. जिल्ह्यातील मोठे गंगापूर, दारणा, कडवा, गिरणा, तसेच आळंदी, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज अशी 13 धरणे शंभर टक्के भरली आहेत.

अतिवृष्टीने पीक भुईसपाट
देवळा तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने ऊस, मका, बाजरी ही उभी पिके भुईसपाट झाली आहेत. कांद्याची रोपे आणि टोमॅटोचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे त्वरित पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राजमानेत वीज पडून तरुणाचा मृत्यू
मालेगाव तालुक्यातील राजमाने येथील प्रवीण वैâलास सोनवणे (18) हा संध्याकाळी शेतात काम करीत होता. पावसाला सुरुवात झाल्यानंतर अचानक वीज कोसळल्याने तो जखमी झाला. मालेगाव सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिका्रयांनी त्याला तपासून मृत घोषित केल्याची माहिती मालेगाव तालुका पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या