
My फिटनेस Funda : नरसिंग यादव, कुस्तीपटू
- फिटनेस म्हणजे : तंदुरुस्त राहणे, शरीर निरोगी ठेवणे म्हणजेच फिटनेस.
- कुस्ती की आरोग्य : कुस्ती. कुस्तीचे खेळाडू तंदुरुस्त असतात. त्यात जास्त कसरत करावी लागते, त्यामध्ये पायापासून डोक्यापर्यंत व्यायाम होतो.
- डाएट की जीवनशैली : डाएट. आपल्या दैनंदिन जीवनात डाएट फार महत्वाचे. ते संतुलित नसेल तर शरीर तंदुरुस्त राहणार नाही. जंक फूडच्या अतिखाण्याने जाडेपणा वाढतो. यामुळे पौष्टीक खाणं आपल्या आरोग्यासाठी फार आवश्यक आहे. त्यामुळे जीवनशैली सुधारते.
- सामान्य माणसासाठी फिटनेस : प्रत्येकाने आपल्या चांगल्या आरोग्यासाठी दिवसातून एक ते दोन तास व्यायामासाठी वेळ काढायलाच हवा. त्याने शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. तासभर व्यायामासाठी द्या.
- व्यायाम कसा करावा : सकाळी व्यायाम केलेला उत्तम. दिवस उत्साहाने सुरु होतो. पण सगळ्यांनाच सकाळी व्यायाम करणं जमत नाही. दिवसभरातून शक्य होईल तेव्हा व्यायाम करा. व्यायामाबरोबर पुरेशी झोपही आवश्यक आहे.
- व्यायाम आणि डाएट समतोल कसा राखता : व्यायाम आणि खाणं दोघांचाही समतोल राखणे गरजेचे आहे. व्यायाम करणाऱ्याला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. प्रोटीनयुक्त पदार्थ खायला हवेत.
- कुस्ती म्हणजे दिसणं, आरोग्य की स्पर्धा : कुस्ती म्हणजे आरोग्य आहे. कुस्ती म्हणजे चांगली कसरत आहे. कुस्तीमुळे मला ओळख मिळाली आहे.
- दिवसातून पाणी किती प्यावे : दिवसातून पाच ते सहा लिटर पाणी प्यायला हवे.
- व्यायामाला किती वेळ देता? : सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास.
- जिमला जायला न मिळाल्यास…? : सहसा व्यायामाला मी सुट्टी कधी देत नाही. पण जिमला जायला न मिळाल्यास घरच्या घरी व्यायाम करतो.
- बाहेर गेल्यावर डाएट कसे सांभाळता? : जे महत्त्वाचे खाणे आहे ते सोबत घेतो. शिवाय ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणची माहिती घेतो, तिथे आपल्याला आवश्यक डाएट मिळते का याची चैकशी करतो आणि त्यानुसार तयारीने बाहेर जातो.
- कोणता पदार्थ नियमित खाता? : फळं, सुकामेवा आणि अंडे.
- फिटनेससाठी कोणत्या गोष्टीचा त्याग केलास? : मी डाएटनुसारच खातो. जंक फूड खात नाही.
- फिटनेसबाबत अपडेट करण्यासाठी? : डायटिशनची मदत घेतो, युटय़ुब, गुगल सर्च करतो.
- फिटनेस मंत्र : मस्त खा आणि स्वस्थ राहा.

























































