’लोकायन’ लोकोत्सव सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकायन संस्था, मुंबई, प्रज्ञा संस्था, नवी दिल्ली आणि एसजीटी विद्यापीठ गुरुग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकायन लोकोत्सवा’चे  आयोजन करण्यात आले होते. ‘हिंदुस्थानी लोकसंस्कृतीचे लोकनायक – लोकनायिका यांची सामाजिक भूमिका आणि समर्पण’ या विषयाला अनुसरून हरियाणाच्या गुरुग्राम येथील एसजीटी विद्यापीठात ही परिषद पार पडले.

‘लोकायन लोकोत्सव’ राष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये देशभरातून अनेक प्राध्यापक, कलाकार तसेच अभ्यासकांनी सहभाग घेतला. त्यांनी आपापल्या राज्यातील लोकनायक – लोकनायिकांचे चरित्र आणि त्यांच्या कार्याविषयीचे महत्त्व सादर करत कालौघात लोप पावलेल्या घटनांवर प्रकाश टाकला. 4 ते 6 जून रोजी पार पडलेल्या तीन दिवसीय परिषदेत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि कला व संस्कृती विभाग, हरियाणा सरकार यांच्या सहकार्याने महाराष्ट्र व हरियाणातील लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील लोककला ताल वाद्य कचेरी, गण, पिंगळा, बोबडी गवळण, भारूड, अभंग, जाती विसर्जन लावणी, छक्कड, पोवाडा, तुंबडी, गोंधळ आणि हरियाणवी लोकनृत्याचे उर्जावान या लोककलांचे राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण करण्यात आले.

शोधपत्राचे पुस्तक प्रकाशन

सोहळ्यादरम्यान एक विशेष शोधपत्राचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. यावेळी एसजीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. हेमंत वर्मा, प्र-कुलपती प्रा. डॉ. जगदीश्वर राव बसुतकर, प्रज्ञा संस्थेचे देवेंद्र राय आदी उपस्थित होते. या राष्ट्रीय संशोधन परिषदेची संकल्पना आणि संयोजन लोकायन संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मोनिका ठक्कर आणि सचिव योगेश्वर लोळगे यांनी केले.