
2019 मधील सर्वोकृष्ट कलाकृतींसाठीच्या पुरस्कारांची घोषणा सोमवारी नवी दिल्लीत कऱण्यात आली. या पुरस्कारांची घोषणा गेल्यावर्षी मे महिन्यात होणार होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या पुरस्कारांची घोषणा पुढे ढकलली होती. नवी दिल्लीमध्ये सोमवारी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये मराठीने बाजी मारली असून डंका, बार्डो आणि आनंदी गोपाळने ज्युरींचे मने जिकंली आहेत.
या पुरस्कारांमध्ये अभिनेत्री अभिनेत्री कंगना रणौतला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सुशांतच्या छिछोरेलाही पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्कारातील विजेत्यांची नावे
बेस्ट बुक्स स्पेशल मेन्शन
मराठी पुस्तक- सिनेमा पाहणारा माणूस – अशोक राणे
नॉन फिचर फिल्म
बेस्ट इनवेस्टिगेटीव्ह फिल्म – जक्कल (मराठी)
निर्माते – निऑन रिल क्रिएशन
दिग्दर्शक – विवेक वाघ
नॉन फिचर फिल्म
बेस्ट डेब्यू नॉन फिचर फिल्म ऑफ अ डिरेक्टर – खिसा (मराठी)
निर्माते : पी पी सिने प्रोडक्शन
दिग्दर्शक : राज प्रीतम मोरे
फिचर फिल्म
स्पेशल मेन्शन- पिकासो (मराठी)
दिग्दर्शक : अभिजित मोहन वारंग
बेस्ट मराठी फिल्म – बार्डो
निर्माते : रितू फिल्म कट एलआयपी
दिग्दर्शक : भीमराव मुडे
बेस्ट प्रोडक्शन डिझाइन
आनंदी गोपाळ (मराठी)
सुनील निगवेकर आणि नीलेश वाघ
बेस्ट फिल्म ऑन सोशल इश्श्यू
आनंदी गोपाळ (मराठी) दिग्दर्शक – समीर विद्वांस
बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर – सावनी रवींद्र
गाणं- रान पेटलं – बार्डो (मराठी)
बेस्ट ऑडिओग्राफी (साउंड डिझायनर)
त्रिज्या (मराठी) मंदार कमलपूरकर




























































