पत्नीला सोडल्यामुळे 25 प्रवासी हिंदुस्थानींचे पासपोर्ट सरकारकडून रद्द

26

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पत्नीला सोडल्याच्या कारणामुळे 25 प्रवासी हिंदुस्थानींचे पासपोर्ट केंद्र सरकारने रद्द केले आहेत. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नुकतीच याबाबतची माहिती दिली. या 25 जणांपैकी 8 जणांचे पासपोर्ट मंत्रालयाच्या शिफासरीनुसार रद्द करण्यात आले आहेत. तर इतर प्रकरणांमध्ये राज्य पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली होती, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. प्रवासी हिंदुस्थानी पत्नींना सोडत असल्याच्या तक्रारीत वाढ झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा तक्रारी आमच्यापर्यंत आल्यानंतर प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

काही प्रकरणांमध्ये पासपोर्ट रद्द केल्यानंतर पोलिसांकडून लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकरणांमध्ये अजामीनपात्र वॉरंट बजावूनही पती न्यायालयासमोर हजर होत नसेल किंवा अटक टाळण्याठी जाणूनबुजून सबबी देत असेल अशा वेळी लूक आऊट सर्क्युलर बजावण्यात येते, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या