नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची थपथ; 71 खासदारांचाही शपथविधी

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी नरेंद्र मोदींसोबतच 71 खासदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी देशी परदेशी पाहुण्यांसह हजारो मोदी समर्थकांनी उपस्थिती होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन टीममध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात 27 ओबीसी, 10 एससी, 5 एसटी, 5 अल्पसंख्याक मंत्री असतील. तसेच भाजपसह एनडीएतील 11 खासदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

या सोहळ्यासाठी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे उपस्थित होते.

या खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

अमित शाह, एस जयशंकर, मनसुख मांडविया, राजनाथ सिंह, जितिन प्रसाद, जयंत चौधरी, धर्मेन्‍द्र प्रधान, रवणीत बिट्टू, नितिन गड़करी, पीयूष गोयल, मनोहर लाल खट्टर, जितेंद्र सिंह, गजेंद सिंह शेखावत, संजय सेठ, राम मोहन नायडू, सुकांत मजूमदार, प्रह्लाद जोशी, जे पी नड्डा, गिरिराज सिंह, ललन सिंह, सतीश चंद्र दुबे, सीआर पाटिल, पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, बीएल वर्मा, रक्षा खड़से, प्रताप राव जाधव, शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, राव इंद्रजीत सिंह, कृष्णपाल गुर्जर, भूपेंद्र यादव, भगीरथ चौधरी, अन्नपूर्णा देवी, शोभा करंदलाजे, एचडी कुमारस्वामी, नित्यानन्द राय, एस पी बघेल, कमलेश पासवान, अजय टम्टा, रामदास आठवले, वीरेंद्र कुमार, सावित्री ठाकुर, अर्जुन राम मेघवाल, चिराग़ पासवान, जीतन राम मांझी, रामनाथ ठाकुर, जुएल ओराम, श्रीपद येसो नाइक, सर्वानंद सोनोवाल यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.