
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या स्टायलिश लूकसाठी प्रसिद्ध आहे, नुकतेच तिने इंस्टाग्रामवर ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत. 42 वर्षीय श्वेता तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या फिटनेसाठी प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सव लक्षात घेत श्वेताने मिरर वर्क असलेला पिवळ्या रंगाचा शरारा सूट घातला आहे. त्यावर तिने हेवी झुमके घातले आहेत. यावर तिने केस मोकळे सोडले आहेत. तिचे हे सुंदर फोटो शेअर करत तिने पंचमी अशी फोटोओळ दिली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त सेलिब्रिटी ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर करताना दिसत आहेत.


























































