खाणीत अडकलेल्या 15 कामगारांपैकी एकाचा मृतदेह काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । शिलाँग

मेघालयमधील बेकायदेशीर कोळसा खाणीत गेल्या 36 दिवसापासून अडकलेल्या 15 खाण कामगारांपैकी एका कामगाराचा मृतदेह नौदलाच्या जवानांनी आज बाहेर काढला आहे. खाणीत तब्बल 200 फूट खोल खाली गेल्यानंतर जवानांना हा मृतदेह सापडला. दरम्यान, या कामगाराचा मृतदेह मिळाल्याने आता इतर चौदा कामगार देखील मृत पावले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मेघालयमधील जयंतिया हिल्स जिल्ह्यात बेकायदेशीरपणे या कोळसा खाणीचे काम सुरू होते. ही खाण लियटीन नदीच्या अगदी जवळ आहे. 13 डिसेंबरच्या रात्री या खाणीत भूस्खलन होऊन खाणीत 15 कामगार अडकले. तसेच नदीतील पाणी देखील या खाणीत गेले. तेव्हापासून या कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेल्या 36 दिवसापासून नौदलाचे जवान व एनडीआरएफचे पाणबुडे दिवस रात्र मेहनत घेत आहेत.