सुकमा दंतेवाडा सीमेवर चकमकीदरम्यान नक्षल कमांडरचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रायपूर

छत्तीसगडध्ये सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक नक्षल कमांडर मारला गेला आहे. तसेच त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त करण्यात आली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुकमामधील तुंगलडीह पोलीस स्थानकाच्या पुलबगडी जंगलात ही चकमक उडाली. सुकमाचे पोलीस अधीक्षक अभिषेक मीणा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस, एसटीएफ डीआरजीच्या संयुक्त समूहाने पार पाडली. घटनास्थळी मृत पावलेल्या नक्षलवाद्यांकडून हत्यारे जप्त केली असून या चकमकीत ८ ते १० नक्षलवाद्यांना गोळी लागल्याची माहिती आहे.