शरद पवार यांनी दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा….सांगितला पोहण्याचा किस्सा….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारामती कृषी विकास ट्रस्टतर्फे उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाचे उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. यावेळी शरद पवार यांनी लहानपणींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी पोहोण्यासंदर्भातली एक विशेष आठवणही सांगितली.

आंतरराष्ट्रीय स्थरावरचे जलतरण तलाव बघितल्यांनंतर त्यांची आणि आपण सुरू केलेल्या तलावची तुलना केली, तर मला वाटत की हा उत्तम तलावांपैकी एक आहे. याचा लाभ मुलामुलींना घ्यायला हवा. या मुलांनी स्वत:ची प्रकृती मजबूत केली पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपले स्थान प्रस्तापित करण्याकडे मुलांनी लक्ष द्यायला हवे”, असे शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आणि पोहण्याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला.

माझ्या आधी पोहोण्यासंदर्भात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी काही आठवणी सांगितल्या. आम्ही लहान असताना जलतरण तलाव वगैरे काही नव्हते. आम्ही बारामतीतच्या एमएच हायस्कूलच्या पुलाजवळ जो तलाव आहे, तिथे पोहायला जात होतो. त्यावेळी जो पुलावरून उडी टाकेल, तो उत्तम खेळाडू समाजला जायचा, अशी त्यावेळी परिस्थिती होती. अलीकडच्या काळात तिथून जाताना कोणी पोहोताना दिसत नाही. मात्र, आमच्यावेळी कालवे आणि घरची विहीर याचाच वापर पोहोण्यासाठी केला जात होता, असेही पवार यांनी सांगितले.