
चार प्रतिभावंत कलावंतांनी कॅनव्हासवर चितारलेला ब्रश स्ट्रोक्स हा नावीन्यपूर्ण कलाविष्कार बघण्याची संधी आजपासून रसिकांना मिळाली आहे. हे प्रदर्शन 24 एप्रिलपर्यंत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी येथे सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत रसिकांना पाहता येईल.
ब्रश स्ट्रोक्स प्रदर्शनात चित्रकार नीलेश पावसकर, निखिल कांबळे, मोनाली खटाळे, सचिन पेडणेकर यांची मंत्रमुग्ध करणारी चित्रे पाहता येतील. नीलेश पावसकर यांनी कोकणातील नयनरम्य समुद्रकिनारे आणि निसर्गसौंदर्य कॅनव्हासवर उतरवले आहे. कोकणच्या ग्रामजीवनाची झलक निखिल कांबळे यांच्या कलाकृतींमध्ये दिसते. नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या सचिन पेडणेकर यांच्या अंतप्रेरणेतून आणि प्रयोगशीलतेतून साकारलेले स्त्री दर्शन विस्मयकारक आहे.


























































