
पुण्यात एका नेपाळी महिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला पुण्यातील एका सैन्य अधिकार्याच्या घरात बेकायदेशीरपणे राहत होती. याप्रकरणी महिलेविरोधात शासकीय गोपनीयता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. एलिसा मनोज पांडे ही 26 वर्षीय महिला मूळची नेपाळमधील लुंबिनीची रहिवासी आहे. गेली सात महिने ती एका सैन्य अधिकार्याच्या घरात बेकायदेशीरणे राहत होती.
अब्दुल कादीर हजवानी या व्यक्तीने पोलिसांत तक्रार केली होती की एलिसाने व्यवसायाच्या नावाखाली त्यांच्याकडून 85 लाख रुपये उकळले होते. या गुन्ह्याचा तपास करताना एलिसा पुण्यातील सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालाच्या परिसरातील एका सैन्य अधिकार्याच्या घरात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे समोर आहे.
23 मार्च रोजी रात्री 11.30 च्या सुमरास एलिसा फुगेवाडी भागातील एक भिंतीवरून उडी मारून ती या परिसरात बेकायदेशीरपणे घुसली. इतकेच नाही तर एका सैन्य अधिकार्याच्या घरात ती राहतही होती. एलिसा आणि या अधिकार्याची भेट एका पब मध्ये झाल्याचे समोर आले आहे. पोलीस या अधिकार्याची चौकशी करणार आहेत.
पोलिसांनी एलिसाला अटक करून कोर्टात हजर केले. कोर्टाने एलिसाला पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच सैन्य अधिकार्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सैन्याशी परवानगीही मागितली आहे. महिलेने आतापर्यंत किती जणांना गंडा घातला आहे याचा पोलीस करत आहेत.


























































