मॅगीत शिसे आहे, सर्वोच्च न्यायालयात नेसलेच्या वकिलाची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

फास्ट फूड मॅगीमध्ये शिसे असल्याचा आरोप होता, त्यावरून मॅगीवर बंदीही घालण्यात आली होती. त्यावर कंपनीने या आरोपांचा इन्कारही केला होता. परंतु कंपनीच्या वकिलांनीच मॅगीत शिसे असल्याची कबुली दिली आहे. गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान नेसलेच्या वकिलांनी ही कबुली दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नेसलेच्या वकिलांना प्रश्न विचारला की, लोकांनी असे नूडल्स का खावे त्यात शिसे असेल? त्यावर उत्तर देताना नेसलेचे वकील म्हणाले की मॅगीमध्ये योग्य प्रमाणात शिसे आहे.

मॅगीत शिसे सापडल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेसले कंपनीच्या विरोधात कारवाई करण्यास एनसीडीआरसीला परवानगी दिली आहे.