विवेक ओबेरॉयने उडवली टीम इंडियाच्या चाहत्यांची खिल्ली, नेटकऱ्यांनी फटकारले

103

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने सेमी फायनलच्या सामन्यावरून टीम इंडियाच्या चाहत्यांची खिल्ली उडवली आहे. त्याने ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला असून त्यावर नेटकऱ्यांनी त्याला फटकारले आहे.

वर्ल़्डकपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने अखेरपर्यंत झुंज दिली त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत सामना जिंकू या आशेवर चाहते होते. त्यांच्या याच भावनेची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ विवेक ओबेरॉयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्या व्हिडीओवरून टीम इंडियाचे चाहते भडकले असून त्यांनी विवेकला पाकिस्तानात जाण्यास सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या