‘षड्यंत्र’चा थरार अनुभवा

‘षड्यंत्र’ हा मर्डर मिस्टरी, टेलिप्ले लवकर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही जबदरस्त थरार आणि खिळवून टाकणारी मानसशास्यत्रीय कथा आहे. हाव, महत्त्वाकांक्षा, स्वतःचा बचाव आणि सूड या मानवी भावनांभोवती विणलेल्या या नाटय़ात हिना खान, चंदन रॉय सान्याल आणि कुणाल रॉय कपूर प्रमुख भूमिका साकारत आहेत.रोहन तिवारी आणि नताशा मल्होत्रा तिवारी या विवाहित जोडप्याची कथा सांगितली आहे. नताशा ही एका बांधकाम पंपनीची वारस असते, पण व्यवसायातील कटकारस्थानांपासून दूर एक समाधानी आयुष्य जगत असते. तेव्हाच एका धक्कादायक खुनामुळे नताशाचे आयुष्य बदलून जाते आणि मोहन खन्ना नावाचा  पोलीस अधिकारी खुनाचे रहस्य सोडवण्यासाठी येतो. ही मर्डर मिस्टरी 18 डिसेंबर रोजी ‘टाटा प्ले’ थिएटरवरून प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘झी 5’वरही उपलब्ध असेल. ‘षड्यंत्र’ पारंपरिक अगाथा ख्रिस्तीच्या गूढकथांसारखीच आहे, पण या कथेला अनेक पदर असल्याचे दिग्दर्शक गणेश यादव यांनी सांगितले.