नौदल अधिकाऱ्यांच्या खांद्यावर झळकणार शिवरायांच्या राजमुद्रेचं चिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नौसेना दिनाच्या निमित्ताने हिंदुस्थानी नौदलात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्याची घोषणा यापूर्वीच नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. नौदलाच्या अॅडमिरल्सच्या खांद्यावर हिंदुस्थानी पद्धतीचे एपॉलेट्स लागणार आहेत. त्यावर नौदलाच्या ध्वजाप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेचं अष्टकोनी चिन्ह असणार आहे.

शुक्रवारी या एपॉलेट्सचं अनावरण करण्यात आलं. त्यावर सगळ्यात वरच्या बाजूला सोनेरी बटन असेल. त्यावरही नौदलाचं चिन्हं कोरलेलं असणार आहे. त्याखाली शिवरायांच्या राजमुद्रेचा अष्टकोन आणि त्यात देशाची राजमुद्रा असेल.

त्या खालोखाल तलवार आणि संगिनी एकमेकांवर क्रॉस रुपात दिसतील. तर त्याखाली सदर अधिकाऱ्याला मिळालेले स्टार्स लावले जाणार आहेत. 2023च्या नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बदलाची घोषणा केली होती.