
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गेल्या वर्षी रिलायन्सने अवघ्या दीड हजार रुपयात जिओ फोनची घोषणा करून ग्राहकांना खूषखबर दिली होती. मात्र या फोनमध्ये व्हॉट्सअॅप नसल्याने अनेकांची निराशा झाली होती. ग्राहकांची ही मागणी लक्षात घेऊनच रिलायन्स जिओने आता व्हॉट्सअॅप असणारा नवीन फोन बाजारात आणण्याचं ठरवलं आहे. १५ ऑगस्टपासून हा फोन बाजारात येणार असून तो अवघ्या २,९९९ रुपयांत ग्राहकांना मिळणार आहे. जिओचा फोन असलेल्या ग्राहकांना ५०० रूपये भरून हा नवा फोन मिळवता येऊ शकणार आहे. रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४१ व्या वार्षिक बैठकीत या जिओच्या नव्या फोनची घोषणा करण्यात आली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या या बैठकीत जाहीर करण्यात आलेल्या या फोनमध्ये व्हॉटसअॅपसोबतच युट्यूब आणि फेसबुकदेखील वापरता येणार आहे. व्हॉईस कमांडची सुविधा देखील या फोनमध्ये देण्यात आली आहे.
रिलायन्सच्या या वार्षिक बैठकीतील महत्वाचे मुद्दे
- जुना जिओ फोन असलेले ग्राहक अतिरिक्त पैसे भरून नवा जिओ फोन खरेदी करू शकतात
- जुन्या जिओ फोनची किंमत १५०० रुपयांवरून थेट ५०० रुपये करण्यात आली आहे
- जिओ फोन-२ व्यतिरिक्त जियो गीगा टीव्हीची घोषणा करण्यात आली आहे
-
जियो गीगा टीव्हीची हा सेट टॉप बॉक्स असून त्याच्या रिमोटमध्ये व्हॉईस कमांडचा पर्याय देण्यात आला आहे
-
गीगा टीव्ही सेट टॉप बॉक्समुळे टिव्हीवरून व्हिडीओ कॉलिंगही करता येऊ शकेल
-
गीगा फायबर या ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटीचीही घोषणा करण्यात आली आहे.
-
१५ ऑगस्ट पासून गीगा फायबरसाठी नोंदणी सुरू होणार आहे.






















































