बाला- टक्कल लपवले म्हणून नववधूची पतीविरोधात पोलिसांत तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी आयुषमान खुराणाचा बाला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात आयुषमान खुराणा आपले टक्कल लपवून यामी गौतमीशी लग्न करतो. आयुषमानचे बिंग फुटल्यानंतर यामी गौतमी आयुषमानला सोडून जाते.

अगदी अशीच सत्य घटना मुंबईत घडली आहे. लग्नापूर्वी टक्कल लपवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. नववधूने पोलिसांत तक्रार दाखल केली असून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. संगीता (नाव बदलले) आणि जय (नाव बदलले) या दोघांचे ऑक्टोबर महिन्यात अरेंज मॅरेज झाले होते. जयचे केस गळाले असून त्याला टक्कल पडले आहे. ही बाब जयने संगीतापासून लपवून ठेवली. लग्नानंटर संगीताला ही गोष्ट कळाली तेव्हा तिच्या पायाखालील जमीनच सरकली.

संगीताने पोलिसांत तक्रार दाखल केली असून जय विरोधात विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जर लग्नापूर्वीच आपल्याला ही गोष्ट कळाली असती तर आपण जयसोबत कधीच लग्न केले नसते अशी प्रतिक्रिया संगीताने दिली आहे. तसेच ही बाब खुप क्षुल्लक आहे अशी प्रतिक्रिया संगीताच्या सासरच्या मंडळींनी दिली आहे.