
विरारमध्ये एका नविवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रिया कांबळे असे या महिलेचे नाव असून ऑक्टोबरमध्येच तिचे लग्न झाले होते.
प्रिया कांबळे या महिलेचे अमर कांबळे या व्यक्तीशी 21 ऑक्टोबर रोजी लग्न झाले होते. दोघे विरारमधील एका इमारतीत राहत होते. अमर कांबळे यांची रात्रपाळी असल्याने ते कामाला गेले होते. सकाळी आल्यावर प्रिया ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. प्रियाच्या मनगटावर एक जखमी होती अशी माहिती पती अमर यांनी दिली.
प्रियाचे लग्नापूर्वी एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. अमर कांबळे यांनी या तरुणावर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केल आहे.



























































