
सरकारचे निर्णय आणि घडामोडी यांची इत्थंभूत माहिती समाजाला वर्षभर पुरवणाऱया वृत्तपत्र विव्रेत्यांना कायमस्वरूपी स्टॉल द्या आणि घरकुल योजना राबवा अशी मागणी मुंबई ठाणे वृत्तपत्र विव्रेता एकीकरण समितीने खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. याबाबत समितीच्या वतीने त्यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
समाजात वृत्तपत्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजातील घडामोडी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तपत्रे करतात. केंद्र व राज्य शासनाने लोकसभा व विधानसभेत घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे कामही वृत्तपत्रांच्या माध्यमातून होते. त्यामुळे वृत्तपत्रांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारचेच काम होत असल्याचे समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
360 दिवस हा घटक काम करतो. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या सोयीसुविधांपासून हा घटक वंचित राहिला आहे. त्यामुळे वृत्तपत्र विव्रेत्यांच्या मागण्यांची दखल घेऊन या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मुंबई-ठाणे वृत्तपत्र विव्रेता एकीकरण समितीचे सदस्य अजित पाटील, सी. एल. सिंग, अजित सहस्रबुद्धे, जीवन भोसले उपस्थित होते.
अशा आहेत महत्त्वाच्या मागण्या
वृत्तपत्र विव्रेत्यांना कायमस्वरूपी स्टॉल परवानगी.
वृत्तपत्र विव्रेत्यांसाठी घरकुल योजना राबवावी.
वृत्तपत्र विव्रेता संघटना/संस्थेसाठी शासनाकडून भूखंड.
शासनाकडून वृत्तपत्र विव्रेत्यांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा.


























































