केडगाव प्रकरणाची पुढील सुनावणी दि. २० जुलै रोजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचे दोषारोप पत्रपत्र सीआयडीने न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणातील आठ आरोपींना सुनावणीसाठी नगरच्या न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात आले होते. आरोपींना दोषारोपत्र देण्यात आले. आरोपींच्या वकीलांनी न्यायलायामध्ये दोषारोप पत्रातील अन्य कागदपत्र मिळवीत, अशी मागणी केली. याप्रकरणी न्यायालयाने तपासी अधिकार्‍यांना म्हणणे मांडण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.पाटील यांनी दिले असून या प्रकणाची पुढील सुनावणी दि. २० जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

केडगाव मनपा निवडणूक निकालाच्या दिवशी शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात आ. जगताप यांच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना सध्या न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. यामध्ये आमदार संग्राम जगताप व बाळसाहेब कोतकर यांना जामीन मिळाला आहे. अन्य आठ आरोपी अटकेमध्य आहेत. सुरवातीला या घटनेचा तपास येथील पोलीस पथकाने केला होता. त्यानंतर तो तपास दि. ६ जुलै रोजी सीआयडी कडे वर्ग करण्यात आला होता. मागील आठवड्यात तपासी अधिकारी अरुणकुमार सपकाळे यांनी आठ जणांविरुद्ध दोषारोप पत्रपत्र दाखल केले. या दोषारोप पत्रपत्रामध्ये आ. संग्राम जगताप व बाळासाहेब एकनाथ कोतकर यांची नावे समाविश्ठ करण्यात आली नाहीत.

गुन्हा घडल्यापासून ९० दिवस आरोपी न्यायालयीन कोठडीत होते त्यांची नावे दोषारोप पत्रात नाहीत. सीआरपीसी १७३(८) अन्वय अतिरिक्त पुरावा दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. दरम्यान दोषारोप पत्रात नाव नसल्याने त्यांना जामीन देणे कायदेशीर असल्याने आ.संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांना जामीन मंजूर करण्यात आला.

दरम्यान दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर सुनावणीसाठी शुक्रवारी (दि. १३) तारीख ठेवण्यात आली होती असून यातील आरोपी भानुदास एकनाथ कोतकर, संदिप रायचंद गुंजाळ, नगरसेवक विशाल बाळासाहेब कोतकर, रवींद्र रमेश खोल्लम, बाबासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर उर्फ बी. एम., संदिप उर्फ जान्टी बाळासाहेब गिर्‍हे आणि महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे यांना हजर करण्यात आले आहे. आज आठही आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना तपासी अधिकार्‍यांच्या कडून दोषारोप पत्र न्यायालयात देण्यात आले आहे. आरोपींच्या वतीने अ‍ॅड.महेश तवले, अ‍ॅड सतिश गुगळे यासह इतर वकील न्यायलयात हजर होते.

आज आरोपींना दोषारोप पत्र दिल्यानंतर त्यातील असणार्‍या अन्य बाबी संदर्भात अ‍ॅड.महेश तवले यांनी न्यायालयासमोर पोलीस तपासामध्ये ज्यांचे जबाब घेतलेले आहे. ते कशापध्दतीने घेतले आहेत. त्याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच न्यायालयामध्ये घटना घडल्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले आहे असे म्हंटले असून ते आरोपींना देण्यात आलेले नाही. यासह काही बाबी न्यायालयासमोर मांडल्या, आम्हाला त्याची पुर्तता करुन द्यावी असा युक्तीवाद केला. न्यायलयाने या संदर्भामध्ये तपासी अधिकार्‍यांना म्हणणे मांडण्यास सांगितले असून याची पुढील सुनावणी दि.२० रोजी ठेवण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान, न्यायालयाने दोषारोप पत्रातून आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्या संदर्भात तपासी अधिकारी सपकाळे यांना नोटीस बजावून दोषारोप पत्र वेळेत का दाखल केले नाही म्हणून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत १६ जुलै रोजीपर्यंत देण्यात आली आहे. आज सीआयडीचे अधिकारी न्यायालयात हजर झाले असता त्यांनी कोणती माहिती देण्यास नकार दिला.