माझा उत्तराधिकारी हिंदुस्थानमधून होणार

सामना ऑनलाईन। धर्मशाला

सर्वधर्म समभाव मानणाऱया हिंदुस्थानात कोणत्याही भीती अथवा दहशतीशिवाय मी गेली 60 वर्षे राहत आहे. त्यामुळे येत्या काळात माझा उत्तराधिकारी स्वतंत्र अशा हिंदुस्थानमधून होण्याची शक्यता जास्त आहे, असे तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी स्पष्ट केले आहे.

चीनने जर सक्तीने लामांचा उत्तराधिकारी जाहीर केला तर त्याला तिबेटी जनता स्वीकारणार नाही. चीन लामांच्या पुनर्जन्माला जास्त महत्त्व देत आहे. त्यामुळे मी माझा उत्तराधिकारी घोषित करण्यापेक्षा चीन ज्या लामाला माझा उत्तराधिकारी घोषित करेल, त्याला लोक स्वीकारणार नाहीत, याचीच चीनला जास्त चिंता आहे, असेही ते म्हणाले. येत्या काळात चीन लामा घोषित करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.