
‘अॅण्टेलिया’ स्फोटक कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला निलंबित एपीआय सचिन वाझे याच्या एनआयए कोठडीत 7 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कोठडीची मुदत संपल्याने वाझेला आज एनआयए पथकाने कोर्टात हजर केले होते.
अॅण्टेलियाजवळ स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर एनआयएने सीआययूचा तत्कालीन इन्चार्ज सचिन वाझे याला 13 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझेचे नाव समोर आल्यानंतर हे प्रकरणदेखील एनआयएकडे तपासाकरिता आले. दरम्यान, सचिन वाझेची एनआयए कोठडी आज संपल्याने त्याला एनआयए कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याची आणखी सहा दिवस कोठडी देण्यात यावी अशी मागणी एनआयएने केली होती. मात्र कोर्टाने वाझेच्या कोठडीत 7 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
वाझेच्या हृदयात दोन ब्लॉकेजेस्
वाझे याला आज कोर्टात हजर केले असता त्याचे वकील रौनक नाईक यांनी वाझेला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्याचा अर्ज केला आहे. वाझेच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱया रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस् असल्याचा दावा नाईक यांनी केला आहे. दरम्यान, एनआयए कोर्टाने वाझेचा वैद्यकीय अहवाल मागविला आहे.
एनआयएला त्या ‘इको’ कारचा शोध
पोलीस दलात कार्यरत असताना सचिन वाझेने ज्या आलिशान गाडय़ा वापरल्या होत्या त्या गाडय़ा ताब्यात घेण्यास एनआयएने सुरुवात केली आहे. आतापर्यंत सहा महागडय़ा गाडय़ा जप्त केल्यानंतर एनआयएने आता वाझे वापरत होता त्या इको कारचा शोध सुरू केला आहे.
मुंबई पोलीस मुख्यालयात कार्यरत असताना सचिन वाझे मर्सिडीज, प्राडो, आऊट लँडर, ऑडी अशा महागडय़ा गाडय़ा वापरत होता.
त्या सहा गाडय़ा एनआयएने हस्तगत केल्या आहेत. आता वाझे इको कारदेखील वापरत होता असे समोर आले आहे. ती इको कार जालना येथे राहणाऱया गाडे नावाच्या व्यक्तीची असून त्यांची ती पांढऱया रंगाची इको कार चोरीला गेल्याचे समोर आले आहे. तीन दिवसांपूर्वी एनआयएच्या पथकाने मिठी नदीतून नंबर प्लेट, सीपीयू आदी साहित्य हस्तगत केले होते. त्या नंबर प्लेटचा तपास केल्यानंतर वाझे मारुती इको कारदेखील वापरत होता असे समोर आले आहे. दरम्यान, त्या इको कारचा वापर वाझे दोघांच्या एन्कांऊटरसाठी करणार होता असे सूत्रांकडून समजते. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
अॅण्टेलियाजवळ स्पह्टकांची कार सापडल्यानंतर त्याचा तपास सुरुवातीला सचिन वाझेकडे देण्यात आला होता. वाझेकडेच तपास असल्याने तो मनमानी कारभार करणार होता. ती स्पह्टक ठेवणारे दोघे हाती लागले; मात्र पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत दोघेही मारले गेले असे चित्र वाझेला पुढे जाऊन तयार करायचे होते. परंतु वाझेचा तो डाव फसला. त्यामुळे इको कार हाती लागल्यानंतर बऱयाच बाबींचा खुलास होईल असेही सूत्रांकडून सांगण्यात येते.






























































