रानडुकराच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कासार बालकुंदा

निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील शिवाजी केरबा सारगे हे रानडुक्कराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली . सारगे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सारगे रविवारी दुपारी एकच्या सुमारास शेतात काम करत असताना रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रानडुकराने सारगे यांच्या छाती, मांडीला, पोटाला, पायाला चावा घेतला. यात सारगे गंभीर जखमी झाले आहेत. कासार बालकुंदा व परिसरामध्ये डोंगराळ भाग जास्त असल्याने रानडुकरांनी मोठा हैदोस घातला आहे. त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथमोपचार करून लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती बरी असून परंतु रानडुकरांनी छातीला जास्त चावा घेतल्याने उपचार वेळेवर मिळणे गरजेचे आहे. अशा घटनेमुळे परिसरामध्ये रानडुकराच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.