नीरव मोदीचं प्रत्यार्पण निश्चित, शेवटची संधीही गमावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचं प्रत्यार्पण निश्चित झालं आहे. ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात प्रत्यार्पणाविरोधात अपील करण्याची शेवटची संधीही गमावली आहे. आता त्याच्याकडे कोणताही कायदेशीर मार्ग उरलेला नाही.

गेल्या आठवड्यात हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी ब्रिटीश सुप्रीम कोर्टात नीरव मोदीच्या प्रत्यार्पण आदेशाविरोधातील अपील याचिकेविरोधात उत्तर दाखल केलं होतं. त्यापूर्वी नीरव मोदीला हिंदुस्थानच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी लंडन कोर्टात हिंदुस्थानने याचिका केली होती. मात्र, माझे मानसिक स्वास्थ्य बरोबर नाही. त्यामुळे हिंदुस्थानात माझे प्रत्यार्पण करू नका, अशी याचिका मोदीने केली होती, मात्र आत्महत्या करण्याएवढे मोदीचे मानसिक संतुलन बिघडलेले नाही. त्याचे प्रत्यार्पण केले जाऊ शकते, असा निकाल देत मोदीची याचिका लंडनच्या वेस्टमिन्स्टर जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली होती.

त्यानंतर नीरव मोदीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळली. नीरव मोदीने कर्जाच्या बहाण्याने पीएनबी बँकेला 13 हजार 500 कोटींचा चुना लावला आहे.