
सामना ऑनलाईन । लंडन
पीएनबी बँकेचे 14 हजार कोटी रुपये घेऊन पळालेल्या नीरव मोवीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्याला वेस्टमिन्स्टर न्यायालयात हजर करण्यात आले. नीरव मोदीने जामीनासाठी अर्ज केला होता, हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. 9 दिवसांसाठी त्याला कोठडी सुनावली असून याबाबत पुढील सुनावणी 29 मार्च रोजी होणार आहे.
Nirav Modi’s bail plea rejected by London Court, to remain in custody till March 29 pic.twitter.com/1KmWUqnfr5
— ANI (@ANI) March 20, 2019
याच न्यायालयाने नीरव मोदीच्या अटक करण्याचे वॉरंट जारी केले होते. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी लागणार्या कागदपत्रंसाठी हिंदुस्थानी अधिकारी लवकर लंडनला रवाना होणार आहेत.
नीरव मोदीच्या मालकीचे 173 चित्र आणि 11 गाड्या लिलाव करण्याची परवानगी अमलबजावणी विभागाने घेतली आहे. नीरव मोदीकडे रॉल्स रॉयस, पोर्शे, मर्सिडीज सारख्या अलिशान गाड्या आहेत. तर दुसरीकडे न्यायालयाने नीरव मोदीची पत्नी एमी मोदीच्या विरोधात अजामीनापात्र वॉरंट जारी केले आहे.
























































