तणावग्रस्त स्थितीमुळे औपचारिक समावेशाआधीच ‘निर्भय’ एलएसीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढच्या महिन्यात सातवी चाचणी झाल्यानंतर ‘निर्भय’ सबसॉनिक क्रूझ मिसाइलचा औपचारिकरित्या हिंदुस्थानी लष्कर आणि नौदलात औपचारिक समावेश होणार आहे. पण त्याआधीच पूर्व लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या नियंत्रण रेषेजवळ तणाव वाढल्याने हिंदुस्थानने ही क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. ‘निर्भय’ मिसाइलची रेंज एक हजार किलोमीटर आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वैज्ञानिकांनी या मिसाइलची निर्मिती केली आहे. निर्भय क्षेपणास्त्रात जमिनीपासून 100 मीटर ते चार किलोमीटर अंतरावरून उड्डाण करून लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र 300 किलो वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते.