नीता अंबानी पितात 3 लाखांचा चहा, जाणून घ्या काय खास आहे यात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो. सौ. इंस्टाग्राम

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे इंडियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी अनेकदा चर्चेत असतात. नीता अंबानी एक यशस्वी व्यावसायिक महिला आहेत.

 

मुकेश अंबानींसोबत व्यवसाय सांभाळण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. दरम्यान नीता अंबानीचे असे अनेक महागडे छंद आहेत जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

 

नीता अंबानी आपल्या दिवसाची सुरुवात 3 लाख रुपयांच्या चहाच्या कपाने करतात. वास्तविक, नीता अंबानींचा हा क्रॉकरी सेट जपानमधून आयात केला आहे.

नोरिटेक क्रॉकरी हा जपानचा खूप जुना ब्रँड आहे. तो बऱ्यापैकी महागही आहे. या सेटच्या एका कपची किंमत 3 लाख रुपये आहे. या कपची खास गोष्ट म्हणजे त्याला सोन्याची बॉर्डर आहे.

नीता अंबानी यांना चहा खूप आवडतो. एका मुलाखतीदरम्यान त्यांना खाण्यापिण्याच्या आवडीबद्दल विचारले असता त्यांनी चहाचा उल्लेख केला. नीता अंबानी जो चहा पितात, त्याचे पान खूप महागात येते. याशिवाय ती ज्या कपमध्ये चहा पितात तो कप जगातील सर्वात महागड्या ब्रँडपैकी एक आहे.