
सामना प्रतिनिधी । कणकवली
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामावरील अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर आंदोलनादरम्यान चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नीतेश राणे यांच्यासह 19 कार्यकर्त्यांना सिंधुदुर्गचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (2) आर. बी. रोटे यांनी 20 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. चौपदरीकरणाचे काम सुरू असून ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे चिखलमय महामार्ग आणि त्यामुळे येथील जनतेमध्ये त्याविरोधात निर्माण झालेला संताप यातून ही घटना घडली होती. यात गुन्हा करण्याचा उद्देश नव्हता अशी बाजू न्यायालयासमोर नितेश राणे यांच्या वकिलांनी मांडली.

























































