
सामना ऑनलाईन, मुंबई
अंधेरी आणि विले पार्ले स्थानकादरम्यान पुलाचा काही भाग पडल्याने सात जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. यातील दोन जण गंभीर असून त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही मृत्यूमुखी पडलेले नाहीये, मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी ‘जर या दुर्घटनेत जे कोणी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले असतील त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यास ईश्वर मदत करो’ अशी प्रार्थना केली आहे. जखमींची प्रकृती बरी होवो अशी प्रार्थना करण्याऐवजी त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणारे हे विधान का केलं याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
*Mumbai Congress President Sanjay Nirupam on Andheri Bridge Collapse*@sanjaynirupam #AndheriBridgeCollapse pic.twitter.com/xY0HPx0YAH
— Manish Shah (@ManishShahAICC) July 3, 2018
मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गोखले पुलाचा पादचाऱ्यांसाठी राखीव असलेला भाग कोसळला. सहाही मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने आणि ढिगारा ट्रॅकवरच कोसळल्याने अंधेरीहून होणारी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. पूल कोसळत असताना त्यावरून जाणारे पादचारी हे देखील खाली पडले आणि ढिगाऱ्याखाली दबले, ज्यामुळे ते जखमी झाले आहेत.
























































