मुंबईकरांसाठी खूशखबर! मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळी सुट्टय़ा असल्याने आपल्या कुटुंबकबिल्यासह फिरण्यासाठी मुंबईकर मोठय़ा संख्येने घराबाहेर पडतात. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने मेन आणि हार्बर मार्गावर उद्या रविवारी कोणताही मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेकडून उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत तांत्रिक कामे करण्यासाठी प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. त्यामुळे मध्य आणि हार्बरच्या प्रवाशांना ऐन सुट्टीच्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागतो. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने रविवारी मेन आणि हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुट्टीच्या मुहूर्तावर घराबाहेर पडणाऱ्यांना प्रवास विना धक्काबुक्कीचा होणार आहे.

दरम्यान, ठाणे-वाशी, नेरुळ या ट्रान्सहार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यानुसार ट्रान्सहार्बर ठाणे-वाशी, नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ठाणे-नेरुळ, वाशी, पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल सेवा रद्द असणार आहेत.