
गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांसोबत सुखी राहू शकत नाही, असे सांगत एका फॅशन डिझायनर तरुणीने अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आयुषी दिक्षीत (वय 25) आहे. आयुषीने आत्महत्या केली त्यावेळी तिची आई तिच्यासोबत घरातच होती. आयुषीने लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना सापडली असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.
गाझियाबादच्या नंदग्राम भागात राज नगर एक्सटेंशन सृष्टि सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली आहे. मेरठच्या कंकरखेडा येथील सतीश दिक्षीत कुटुंबासोबत फ्लॅट नंबर 1101 मध्ये राहतात. त्यांची मेरठ रोडवर एक फॅक्टरी आहे. सतीश यांची मुलगी आयुषी नोयडातील गौरव स्टुडिओत फॅशन डिझायनर आहे.
आयुषी सोमवारी रात्री 8 वाजता घराच्या बालकनीत आली. ती खुर्चीवर चढली आणि रेलिंवरून खाली उडी घेतली. तिने उडी घेतल्यावर झालेल्या आवाजाने तिची आई धावतच बालकनीत आली. तसेच इमारतीचा सुरक्षआ रक्षकही धावतच तिथे पोहचला. घटनेची माहिती मिळताच परिसरात गर्दी झाली होती. जखमी झालेल्या आयुषीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणी करून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनास्थळी सुसाइड नोट आढळली आहे. त्यात नोकरीतील ताणतणावामुळे आत्महत्या करत असल्याचे आरुषीने म्हटले आहे. आपल्याला जे ध्येय गाठायचे होते, त्यात अपयश आल्याने हा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही तिने म्हटले आहे. तसेच आपल्या वडिलांसोबत त्यांच्या राज्यात कोणीही सुखी राहू शकत नाही, असेही तिने सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. या सुसाइट नोटमध्ये लिहिलेल्या तपशीलाच्या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहेत.
आत्महत्या करण्याच्या दिवशी आयुषी खूप नैराश्यात होती. तिने सकाळपासून काहीही खाल्ले नाही. तसेच सकाळचा चहादेखील तिने घेतला नव्हता. कोणत्यातरी कारणाने ती खूप त्रासलेली दिसत होती. मात्र, ती टोकाचे पाऊल उचलेल, याची कल्पना नव्हती, असे तिच्या कटुंबियांनी सांगितले. ती तीन वर्षांपासून नोयडात फ२शन डिझायनर म्हणून काम करत होती.






















































