कोणत्याही अवैध गटाला मान्यता देण्यात येऊ नये; अरविंद सावंत यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार दुसऱ्या गटात गेले आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्ष यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्याबाबत शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना पक्ष कुठल्याही पक्षात विलीन झालेला नाही आणि होऊ शकत नाही, असे ठणकावत सांगितले. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोणत्याही अवैध गटाला किंवा विलीनीकरणाला मान्यता देऊ नये, असे म्हटले आहे. याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्रही देण्यात आले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा मूळ पक्ष कुठल्याही पक्षात विलीन झालेला नाही आणि होऊ शकत नाही. तसेच हा पक्ष 2/3 ने फुटलेला नाही. त्यामुळे कायद्यानुसार मूळ पक्षाच्या संमतीशिवाय लोकप्रतिनिधींना स्वतःहून विलीनीकरणाचा कोणताही अधिकार नाही. कथित ‘विलीनीकरणाचा’ दावा घटनात्मक दृष्ट्या पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पक्षाची अधिकृत भूमिका संबंधित खासदारांना अधिकृत पत्राद्वारे सूचित केली आहे. तसेच, माहिती व संदर्भासाठी पत्रांची प्रत सन्माननीय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देखील पाठविली आहे, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.