सूर्यकुमारच्या शतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानचे न्यूझीलंड समोर 192 धावांचे लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना माउंट मौनगानुई येथे खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघासमोर हिंदुस्थानने 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना माऊंट मौनगानुई येथे खेळला जात आहे. या सामन्यात किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थानी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आणि धावफलकावर 6 गडी गमावून 191 धावा केल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून दमदार शतक झळकले. या शतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने किवी संघाला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साउदीने शेवटच्या ओव्हरमध्ये हॅट्ट्रिक साधली.