अवघ्या 11 वर्षांच्या मुलीने विकसित केले कोविड प्रतिबंधित क्षेत्राची माहिती देणारे उपकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुवनेश्वरच्या प्रतिभा पिल्लइने आपल्या अनोख्या प्रतिभेचं दर्शन घडवले आहे. तिने कोविड प्रतिबंधित क्षेत्राची माहिती देणारे ‘कोरोना व्हायरस ह्युमन डिटेक्टर’ हे अनोखे उपकरण तयार केले आहे. कोविड प्रतिबंधित क्षेत्र म्हण्नू घोषित झालेल्या मॉल, शैक्षणिक संस्था किंवा औद्योगिक आस्थापना यांच्या प्रवेशद्वारावर हे उपकरण बसवायचे. त्यामुळे त्या भागातून जाणाऱया लोकांना या प्रतिबंधित क्षेत्राच्या माहितीचा ऍलर्ट मिळेल. तसेच इतर कुणी प्रतिबंधित भागात शिरले, तर त्याचीही माहिती मिळेल. प्रतिभा सहावीत शिकते. तिने शिक्षकांच्या मदतीने हे ऍप विकसित केले आहे.

उपकरण कसे काम करेल…

सर्वात आधी लॅपटॉपमध्ये ऑप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर हे उपकरण जोडले जाईल. उपकरणाला ऍपसोबत लिंक केल्यानंतर ज्या परिसरावर देखरेख ठेवायची आहे, त्या परिसरातील ठरावीक अंतरसीमा निश्चित करावी लागेल. l जर कुणी कोविड झोनमध्ये प्रवेश केला की, बझर वाजू लागते आणि उपकरणावरील लाल दिवा पेटतो. या उपकरणाचा वापर करून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यास मदत होईल, असे प्रतिभाला वाटते. ऐकू येत नाही, अशा लोकांनाही उपकरण वापरता येईल. कारण लाल दिव्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राचा अलर्ट त्यांच्या चटकन लक्षात येईल.