
ओडिशा राज्याचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर अज्ञाताने गोळी झाडल्याचं वृत्त आहे. ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दास जात असताना त्यांच्यावर काही अज्ञातांनी गोळी झाडली. या हल्ल्यानंतर दास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.




























































