
सामना ऑनलाईन । कराड
कराड- विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील जूना ब्रिटीशकालीन पूल कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. नवीन पूलाचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक महिन्याभरापासून बंद होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सोमवारी दुपारी या पुलाचा काही भाग नदीत पडला. हा पूल ब्रिटीशकालीन असून जीर्ण झाल्यामुळे या पूलाच्याशेजारी नवीन पूल उभारण्याचे काम सुरू होते. त्यामुळे महिन्याभरापासून या मार्गावरील वाहतूक बंद होती.

































































