धडधड वाढली; ओमायक्रोन 23 देशांमध्ये धडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटने संपूर्ण जगाला भयंकर चिंतेत टाकले आहे. अवघ्या आठवडाभरात हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतून तब्बल 23 देशांमध्ये पोहोचला आहे. या व्हेरिएंटचा झपाटय़ाने प्रसार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच देशांनी प्रतिबंधात्मक कठोर पावले उचलली आहेत. 30 हून अधिक देशांनी आपल्या सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत. ओमायक्रोनविरोधी लढय़ात सर्व देश मोठय़ा ताकदीनिशी उतरले आहेत.

ओमायक्रोनचा संसर्ग अत्यंत धोकादायक असल्याचे जाहीर करून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) धोक्याचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने सर्व देश अॅलर्ट मोडवर आले असून ओमायक्रोनचा संसर्ग रोखण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय संबंधांवर निर्बंध आणत आहेत. ओमायक्रोन व्हेरिएंट बुधवारपर्यंत ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बोत्सवाना, कॅनडा, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, जर्मनी, हाँगकाँग, इस्रायल, इटली, जपान, नेदरलँड, नायजेरिया, पोर्तुगाल, रीयुनियन, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि ब्रिटन या देशांमध्ये पोहोचला आहे. बुधवारी दक्षिण कोरियातही 5 रुग्ण आढळले. हे नागरिक नायजेरियातून आले आहेत. ओमायक्रोनच्या या वेगवान प्रसारामुळे संपूर्ण जगाची चिंता दिवसेंदिवस आणखी वाढत चालली आहे.

या देशांमध्ये निर्बंध आणखी कडक

ब्रिटेन, अमेरिका, ओमान, पाकिस्तान, पराग्वे, फिलिपाइन्स, पोलॅंड, रशिया, रवांडा, सौदी अरेबिया, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, तुकाa, संयुक्त अरब अमीरात, अंगोला, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, पंबोडिया, पॅनडा, इक्वाडोर, इजिप्त, फ्रान्स,जर्मनी, इंडोनेशिया, इटली, पुवैत, मलेशिया, मालदीव, माल्टा, नेदरलँड्स या देशांनी कोरोना निर्बंध आणखी कडक केले आहेत. आफ्रिकन देशांतील प्रवाशांना काही दिवसांसाठी प्रवेशबंदी केली आहे.

या पाच देशांत सर्वात जास्त रुग्ण

  • दक्षिण अफ्रिका       77
  • बोत्सवाना       19
  • ब्रिटन    22
  • नेदरलॅण्ड्स     16
  • पोर्तुगाल  13
  • जगभरात एकूण रुग्ण     209