चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयकडून ज्युनिअर आर्टिस्टला मुंबईतून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाईल्ड पॉर्नचे रॅकेट चालवल्या प्रकरणी सीबीआयने मुंबईतून एका 30 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपी टीव्ही सीरियल्समध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होता. इन्स्टाग्रामवर तो अल्पवयीन मुलांशी संपर्क साधायचा आणि स्वतःला एक फिल्म स्टार सांगून मुलांना फसवत असे.

सीबीआयने आरोपीच्या घराची झडती घेऊन त्याच्याकडील फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे. फॉरेन्सिक टेस्ट नंतर फोन आणि लॅपटॉपमध्ये अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. हे व्हिडीओ तो आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हॉट्सऍप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून विकत असे. आरोपी मुळचा उत्तर प्रदेशच्या हरिद्वारचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

आरोपी इन्स्टाग्रामवर 10-16 वयोगटातील मुलांना लक्ष्य करून इन्स्टाग्रामवर त्यांच्याशी संपर्क साधायचा. त्यांच्याशी व्हिडीओ कॉलवर अश्लील संभाषण करायचा आणि त्यांना व्हिडीओ पाठवायला सांगायचा. जर असे कोणी केले नाही तर व्हिडीओ किंवा फोटो तुझ्या कुटुंबीयांना पाठवेन अशी धमकी द्यायचा. सीबीआयने आरोपीला बेड्या घातल्या असून त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई केली आहे.