पॉर्न व्हिडीओ प्रकरण; कोऑर्डीनेटरला नवी मुंबईतून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॉर्न व्हिडीओ प्रकरणी प्रॉपर्टी सेलने आणखी एकाला नवी मुंबईतून अटक केली आहे. उमेश कामत असे त्याचे नाव असून तो काही वर्षांपासून कोऑर्डीनेटर म्हणून काम करत होता. त्याने आता पर्यंत 10-12 पॉर्न व्हिडीओ परदेशात सर्व्हर असलेल्या पंपनीला पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. पॉर्न व्हिडीओ प्रकरणातील ही सातवी अटक आहे.

चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ तयार करून ते वेबसाईडवर अपलोड केले जात असल्याची माहिती प्रॉपर्टी सेलला मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक केदारी पवार, पोलीस निरीक्षक धीरज कोळी, सहायक निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे आदी पथकाने मढ येथे छापा टापून पॉर्न विडिओ रॅकेटचा पर्दाफाश केला.

पोलिसांनी कारवाई करून तेव्हा सहा जणांना अटक केली होती. त्याच्या चौकशीत एका मॉडेलचे नाव समोर आले. तिला देखील प्रॉपर्टी सेलने अटक केली होती. त्यानंतर आज प्रॉपर्टी सेलच्या अधिकाऩयाने उमेशला अटक केली.

उमेश हा एका खासगी पंपनीचा कर्मचारी असून तो कोऑर्डीनेटर म्हणून काम करायचा. परदेशातील पंपनीच्या सांगण्यावरून ते व्हिडीओ तयार केले जात असायचे. उमेश हा काही दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या संपका&त होता.

त्याने आता पर्यंत ईमेल वरून 10-12 पॉर्न व्हिडीओ परदेशात सर्व्हर असलेल्या पंपनीला पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. बहुतांश व्हिडीओ हे कोरोना काळात चित्रित केले गेले आहेत. उमेशला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्याला 10 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

50 अप्सची माहिती पोलिसांच्या हाती
तपासा दरम्यान पोलिसांना 50 अप्सची माहिती हाती लागली आहे. ज्या अप्सवरून पॉर्न व्हिडीओ अपलोड केले गेले होते. एका अप्सवर एक हजार ते लाख असे स्बस्क्राइबर आहेत. दिवसाला एक विडिओ तयार केला जात असून त्यासाठी दोन लाख रुपये इतके खर्च होत असायचा. व्हिडीओ साठी आलेला खर्चाची रक्कम उमेशला आल्यावर तो पुढे अन्य इतरांना पैसे वितरित करायचा.

  • ऑनलाईन पेमेंट अप्सचा केला जात होता वापर
  • उमेशच्या बँक खात्याची होणार तपासणी