एकतर्फी प्रेमातून शालिमार एक्सप्रेसमध्ये ठेवला फटाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकमान्य टर्मिनसच्या यार्डात शालिमार एक्सप्रेसमध्ये प्लॅस्टिकच्या पाइपमध्ये फटाक्याची दारू सापडण्यामागचे नेमके कारण उघडकीस आले आहे. एकतर्फी प्रेम करणार्‍या व दुखावल्या गेलेल्या मजनूने तरुणीच्या पतीला धडा शिकविण्यासाठी हे कृत्य केले होते. टिळकनगर पोलिसांनी बुलढाण्यात जाऊन त्या मजनूच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बुधवारी सकाळी लोकमान्य टर्मिनसच्या यार्डात शालिमार एक्सप्रेसमध्ये प्लॅस्टिकच्या पाइपमध्ये फटाक्याची दारू भरलेली पिशवी सापडली होती. फिकट पिवळ्या रंगाच्या पिशवीत सापडलेली तो फटका म्हणजे जिलेटिनच्या कांड्या असल्याची बोंब उठल्याने घबराटीचे वातावरण पसरले होते. पण अखेर प्लॅस्टिकच्या पाइपमध्ये फटाक्याची दारू असल्याचे निष्पन्न होताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार बुलढाण्यात राहणार्‍या एका तरुणाने केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी बुलाढाणा गाठून त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.