
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेल्टीचा नवरा राज कुंद्रा याने ‘यूटी 69’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. हा सिनेमा शुक्रवारी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला., मात्र सिनेमाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर थंड प्रतिसाद मिळाला असून कमाईचे आकडे पाहून चकीत व्हाल.
राज कुंद्रा याचा ‘यूटी 69’ हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या घोषणेनंतर सिनेमाकडे लोकांचे लक्ष वेधले होते. सिनेमामध्ये राज कुंद्रा यांच्या आयुष्यातील वाद आणि त्याचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा जोरदार चर्चेत होता. मात्र इतका चर्चेत राहूनही या सिनेमाचा प्रदर्शनाचा पहिला दिवस निराशाजनक ठरला. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेण्ड अहवालानुसार, ‘यूटी 69’ ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 10 लाख कमाई केली. हे प्राथमिक आकडे आहेत अधिकृत आकडे आल्यानंतर थोडाफार बदल असल्याचेही बोलले जात आहे.
‘यूटी 69’ हा सिनेमा राज कुंद्रा याच्या आयुष्यावर बेतलेला आहे. त्याला 2021 साली पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्याने कारागृहात घालवलेल्या 63 दिवसांवर हा सिनेमा आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो बराच काळ माध्यमांपासून दूर राहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर कायम तो मास्क घालून होता.त्यानंतर या सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर आला. मात्र हा सिनेमा पहिल्या दिवशी बॉक्स ऑफीसवर फारशी जादू दाखवू शकलेला नाही.


























































