
दिल्लीतील सत्य निकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारतीच्या मालकाला सोमवारी राजस्थानमधील भिवाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली. हरिराम गुप्ता असे ताब्यात घेतलेल्या इमारत मालकाचे नाव आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दिल्लीतील अनेक दशके जुनी असलेल्या सत्य निकेतन या इमारतीत पीजी सुविधा चालवली जात होती. रविवारी दुरुस्तीचे काम सुरू असताना ही इमारत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, अद्याप बचावकार्य सुरू आहे.

























































