पैठण – मराठा तरुणांनी राजकीय पक्षाचा डीजिटल बोर्ड जाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावात कोणत्याही राजकीय पक्षाने डिजिटल बोर्ड लावू नये, अशी भूमिका घेत रविवारी पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात मराठा तरुणांनी पेट्रोल टाकून एका बोर्डासह मतदान ओळखपत्रांची होळी केली.

गावातील “वॉटर पार्क” च्या ऊदघाटना संदर्भात असलेल्या या डिजिटल बोर्डावर सर्वपक्षीय नेते, मंत्री व आमदार यांची छायाचित्रे होती. आर.बी. कृषी पर्यटन अंतर्गत असलेल्या आर.बी. वॉटर पार्क मार्फत हा भव्य फलक लावण्यात आला होता. 3 ते 4 युवकांनी “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा देत हा बोर्ड खाली उतरवला. त्यावर एक टायर ठेवून पेट्रोलची बाटली रिकामी केली. तसेच मतदान ओळखपत्रे टाकून काडी लावली. आगीचा भडका उडाल्यावर पुन्हा घोषणाबाजी करण्यात आली.