
ICC T20 विश्वचषकात रविवारी खेळला गेलेला टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा अविस्मरणी झाला. या सामन्यात विराट कोहलीच्या धडाकेबाज 82 धावांच्या जोरावर टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात कोहलीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यावरून त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून फॉर्म मध्ये नसलेल्या कोहलीने या सामन्यातून कमबॅक केला आङे. त्यावरून खुद्द पाकिस्तानी क्रिकेटपटूही त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याबाबत पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमलने एका वाहिनीवर विराट कोहलीवर स्तुतीसुमने उधळली आङेत. ”विराटने या सामन्यात सिद्ध केले आहे की सध्या क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा जबरदस्त फलंदाज कुणीच नाही. विराटने मेलबर्नमध्ये हरिस रौफला मारलेला षटकार, तो शॉट कोणीही माय का लाल मारू शकत नाही. विराट कोहलीशिवाय जगातील इतर कोणत्याही खेळाडूला अशा प्रकारचा फटका मारता येऊ शकत नाही”, असे कामरान अकमल म्हणाला.
यावेळी त्याने विराटच्या खिलाडू वृत्तीचेही कौतुक केले. ‘विराट हा टीम इंडियाचा मोठा खेळाडू आहे, तरीही तो हार्दिकसोबत फलंदाजी करताना तो जे सांगेल ते ऐकत होता. विराटसमोर हार्दिक ज्युनियर आहे. पण तरीही तो त्याचं ऐकत होता. विराट कोहली खरोखरच महान खेळाडू आह”, असे कामरान म्हणाला.




























































