लंडन ब्रिज हल्ला प्रकरण : हल्लेखोर पाकिस्तानीच, ‘पीओके’त गुपचूप दफनविधी

लंडन ब्रिजवर चाकूहल्ला करून दोघांना ठार मारणारा हल्लेखोर हा पाकिस्तानी नाही असा कांगावा करणार्‍या पाकिस्तानचे पितळ पुन्हा उघडे पडले आहे. हल्लेखोर हा पाकिस्तानीच होता आणि पीओकेत त्याच्या गावात गुपचूप दफनविधी उरकण्यात आला आहे. ब्रिटनची वृत्तवाहिनी स्काय न्यूजने याचा भांडाफोड केला.

लंडन ब्रिजवर हल्ल्यात ठार झालेला उस्मान खान याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी दुपारपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्याचा मृतदेह प्रवासी विमानाने शुक्रवारी सकाळी इस्लामाबादमध्ये आणण्यात आला. त्यानंतर शुक्रवारीच पीओकेतील कजलानी गावात त्याचा दफनविधी गुपचूप उरकण्यात आला. त्या आधी बर्मिंगहॅमध्ये त्याच्या मृतदेहावर इतर धार्मिक विधी करण्यात आले. पाकिस्तानच्या ‘डॉन’ वर्तमानपत्राने उस्मान खान पाकिस्तानी असल्याचे छापल्यामुळे संतापलेल्या जमावाने डॉनच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली होती.

ब्रिटनमध्ये दफनविधीला विरोध

उस्मान खान केंब्रिजमधील स्टॉक ऑन ट्रेंडमध्ये राहत होता. त्यामुळे त्याचा दफनविधी तिथेच केला जाईल असे म्हटले जात होते, मात्र स्थानिक मुस्लिमांनी त्याचा दफनविधी तिथे करण्यास विरोध केला. हल्ल्यानंतरही मुस्लिम समाजाने हल्ल्याचा निषेध केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या