पानिपतला लागली ‘कात्री’, ‘ते’ वादग्रस्त दृश्य वगळले

777

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ या ऐतिहासिक चित्रपटाला राजस्थानमधील जाट समुदायाने विरोध दर्शवला आहे. चित्रपटात महाराजा सूरजमल जाट यांचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर चित्रपटाच्या ज्या दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता, ती  11 मिनिटांची दृश्ये चित्रपटातून वगळण्यात आली आहेत.

चित्रपटातून 11 मिनिटांचा वादग्रस्त भाग वगळण्यात आल्यानंतर सेन्सॉर बॉर्डकडे पाठवण्यात आला. त्यानंतर चित्रपटाला सर्टीफिकेट मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारी एडिशनल चीफ सेक्रेटरी राजीव स्वरुप यांनी सांगितले की, वितरकानेच आपल्याला चित्रपटातील वादग्रस्त भाग वगळल्याचे सांगितले असे म्हटले आहे.

पानिपतमध्ये भरतपूरचा जाट महाराजा सूरजमल लोभी व स्वार्थी असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावर जाट समुदायाने आक्षेप घेत. चित्रपट बंद करण्याचे आवाहन केले होते. कुठलेही संशोधन न करता चुकीच्या व्यक्तिरेखा रंगवल्याचा आरोप जाट समुदायाने केला होता. पण आता चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्यच काढून टाकण्यात आल्याने चित्रपट बंद करण्याचे कारण नाही, असे वितरकांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या