गोपीनाथगडावर तयारी पूर्ण, पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष

1562

राज्याचे लक्ष असणाऱ्या गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 12 डिसेंबरच्या जयंती कार्यक्रमाची सर्व जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ‘हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्ही या..वाट पहाते’ असे ट्विट करत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

कोणाचीही हानी होणार नाही असा भूकंप करण्याचा प्रयत्न करेन – पंकजा मुंडे

गोपीनाथ मुंडे यांचे स्मृती स्थळ असलेल्या गोपीनाथगडावर त्यांच्या जयंतीनिमित्त समाधीचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी राज्याच्या काना कोप-यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, विविध पक्षाचे नेते येत असतात. यंदाही गडावर अलोट गर्दी उसळणार असल्याचे बोलले जात आहे. जयंती कार्यक्रमाची सर्व जय्यत तयारी करण्यात आली असून मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

gopinath-gad1

12 तारखेला सकाळी 11 वाजता पंकजा मुंडे याठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पंकजा मुंडे काय बोलणार भाजप पक्ष सोडणार का? आमचे ठरलेय जे बँनर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. यामुळे गडावर चांगली गर्दी होण्याची शक्यता आहे.

gopinath-gad2

आपली प्रतिक्रिया द्या