…अन पंकजा मुंडेंनी पोलिसांची काठी घेतली हातात

2060

गोपीनाथगडावर गुरुवारी पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाद्वारे कार्यक्रम गाजवलाच. शिवाय कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी त्यांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांना रस्ता देण्यासाठी त्यांनी चक्क पोलिसांच्या हातातली काठी घेत प्रमुख पाहुण्यांना गर्दीतून रस्ता करून देत त्यांना व्यासपीठावर आसनाधीन केले.

झाले असे की आजच्या पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावरील मेळाव्याला अफाट गर्दी झाली होती. कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांना व्यासपीठावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना मोठी अडचण झाली होती. उपस्थित असलेले समर्थक पोलिसांनाही ऐकायला तयार नव्हते. हे स्वतः पंकजा मुंडेंच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिथे बाजूला असलेल्या पोलिसांच्या हातातली काठी घेतली आणि मार्ग काढत पाहुण्यांना त्या खुद्द मंचावर घेऊन गेल्या.यामुळे पंकजा मुंडेंचे वेगळेच स्वरूप आज समर्थकांना पाहायला भेटले.

आपली प्रतिक्रिया द्या